Ad will apear here
Next
‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची हजेरी


मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘छोटी मालकीण’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. याचा प्रत्यय देणारी एक सुखद घटना नुकतीच घडली. श्रीधर आणि रेवतीसोबतच ‘छोटी मालकीण’च्या संपूर्ण टीमवर प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी या मालिकेच्या सेटला भेट दिली. दररोज मालिकेमधून दिसणाऱ्या कलाकारांची प्रत्यक्ष भेट होणे हा आनंद त्यांना सुखावणारा होता. त्यासाठी शहापूर ते मढ असा प्रवास करत ही मंडळी सेटवर पोहोचली आणि ‘छोटी मालकीण’च्या कलाकारांसोबत एकत्र जेवणाचा आनंद लुटला.

शहापूरजवळील सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थिनींनी ‘छोटी मालकीण’च्या सेटवर उपस्थिती लावली. या विद्यार्थिनी ‘छोटी मालकीण’ ही मालिका न चुकता पाहतात. मालिकेवरील याच प्रेमापोटी त्यांनी कलाकारांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली. ‘छोटी मालकीण’च्या सेटवर या लाडक्या चाहत्यांचे थाटात स्वागत करण्यात आले. शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढत कलाकारांनीही त्यांच्याशी मनसोक्त संवाद साधला.



‘छोटी मालकीण’ मालिकेतील श्रीधर म्हणजेच अक्षर कोठारीला या खास चाहत्यांबद्दल समजले तेव्हा तो अतिशय आनंदीत झाला. ‘एरव्ही चाहत्यांना भेटण्याची संधी आम्हा कलाकार मंडळींना खूप कमी वेळा मिळते त्यामुळे माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. ही आठवण मी कॅमेऱ्यात कैद करून ठेवली आहे,’ असे अक्षरने सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZURBU
Similar Posts
‘परंपरेसोबतच स्त्रियांनी आधुनिक विचारांची कास धरावी’ नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. याच निमित्ताने ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिकांमधील नायिकांनी भरभरून शुभेच्छा देतानाच स्त्री-स्वातंत्र्य आणि सबलीकरण यांविषयी रोखठोक मते मांडली आहेत.
‘महिंद्रा’तर्फे ठाण्यात दुसऱ्या जल प्रकल्पाचे उद्घाटन मुंबई : महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (एमएलएल) या कंपनीने सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून शहापूरनजीकच्या टेंभा गावातील जांभूळपाडा येथे दुसरा जल प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार मुंबई : टीव्ही मालिकेमुळे केवळ मनोरंजनच होत नाही, तर चाहत्यांची स्वप्नही पूर्ण होऊ शकतात. नंदूरबारच्या प्रीती नांद्रे या चाहतीनं नुकताच हा सुखद अनुभव घेतला. स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेनं प्रीती यांना मानाचा सोन्याचा हार मिळवून दिला, सोबतच रेवती आणि श्रीधर या जोडीला भेटण्याची संधीही त्यांना मिळाली
राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये माधुरी तारमळेला रौप्यपदक शहापूर : तमिळनाडू सिलंबम असोसिएशन व इंडियन सिलंबम फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तमिळनाडूतील इरोड या शहरात टेक्स वॅली चितोड येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिप स्पर्धेत शहापूर तालुक्यातील माधुरी तारमळेने रौप्यपदकाची कमाई केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language